OK
12
12

Order Summary

3 Products

 1,234

View Cart
MORE
Store Timings
  औषधे आणि भारतीय मानसिकता !!

  औषधे आणि भारतीय मानसिकता !!

  दोन,तीन दिवसांपासून हा विषय लिहावा असं माझ्या डोक्यात घोळतय, त्याला कारणही तसच आहे. परवा एका पेशंटच blood pressure तपासताना बरच जास्त आढळलं,बर पेशंट माझ्याकडे पहिल्यांदाच आलेली, मी विचारलं, म्हटलं काही औषधं वगैरे सुरु आहेत का ? तर म्हणाल्या की हो, एक गोळी चालू आहे, डॉक्टरांनी रोज सकाळी एक घ्यायला सांगितली आहे पण मी अर्धीच घेते, तसा मला काही विशेष त्रास होत नाही हो, मग कशाला उगीच आख्खी गोळी खायची? मी अक्षरशः डोक्याला हात लावला. आपल्या स्वतःच्या स्वास्थ्याच्या बाबतीत इतका विचित्र विचार मला नाही वाटत जगात दुसरीकडे कुठे होत असेल!
  सगळ्यात पहिली मानसिकता तर अशी की,की कितीही त्रास होत असेल तरी आधी तो पुष्कळ दिवस अंगावरच काढायचा ! शरीराचे फार चोचले पुरवले ना की ते जास्तच त्रास देतं अशी काहीशी धारणा.कोणताही त्रास आपोआप बरा होतो अशी अंधश्रद्धा का काय कोणजाणे ! मग तो त्रास असा वाढला की आता कामच अडतंय की मग घरात हळूच त्या त्रासाची वाच्यता करायची आणि मग जोकाही आनंदीआनंद सुरु होतो की विचारू नका.मग जेवढी माणस घरात, नात्यात तेव्हढे सल्ले आणि घरगुती उपाय यांचा माराच सुरु होतो. अनेक ज्ञात, अज्ञात लोकांविषयी आलेल्या गुणाविषयी दाखले दिले जातात, मग काही दिवस त्यापैकी काही उपाय करून पहायचे, तरीही बऱ वाटलं नाही की पुढची पायरी म्हणजे medical stores गाठायचं, तो chemist जणू सर्वज्ञ आहे अश्या थाटात त्याला आपली तक्रार सांगून औषधं मागायची आणि त्या OTC ( over the counter) products वापरून बघायचे. त्यानेही काही होत नाही म्हटल्यावर मग शेवटी नाईलाज म्हणून डॉक्टर कडे जायचे असा हा लांबलचक प्रवास असतो.
  खरी मेख तर पुढेच आहे ! इतकं सगळं होईपर्यंत आजार जुना होतो, त्रास भरपूर वाढलेला असतो, बिचारा डॉक्टर सगळ्या गोष्टींचा उहापोह करतो, विचार करतो आणि मग आजार,त्याचा कालावधी, रुग्णाचं वय, लिंग,वजन अशा एक ना अनेक बाबींचा विचार करून त्या विशिष्ट पेशंट साठी विशिष्ट उपचार ठरवतो आणि तशी औषधे लिहून देतो,काही ठराविक कालावधीने परत तपासायला या म्हणून सांगतो पण —–
  हे काहीही पेशंट लक्षात घेत नाही, परत कशाला तपासायची फी द्या म्हणून पुन्हा त्या डॉक्टरला तोंड दाखवायला जात नाही, मनानेच अनेक दिवस,महिने, वर्षं औषधं घेत राहतो किंवा त्याला मनाला वाटेल त्या dose मध्ये सुरु ठेवतो किंवा सरळ one fine morning चक्क बंद करून टाकतो.
  ही किती गंभीर गोष्ट आहे ते ह्या लोकांच्या लक्षातच येत नाही ही खरंच frustrating गोष्ट आहे एक डॉक्टर म्हणून.
  पुढे या मनमानीचे जे परिणाम व्हायचे ते शरीरावर होतातच आणि मग काहीतरी अतिगंभीर लक्षणे घेऊन रुग्ण आमच्याकडे येतात, पण हे सगळं आपण आपल्याच हाताने ओढवून घेतलेले आहे याची त्यांनाजाणीवही नसते. अगदी detail इतिहास विचारला तर मी वर सांगितलेल्या बहुतेक सगळ्या पायऱ्या त्यांनी exactly follow केलेल्या असतात.
  अगदी किरकोळ तब्येतीच्या तक्रारींसाठी लगेच डॉक्टरकडे जायची गरज नाही हे जसे खरे तसे प्रत्येक तक्रार किरकोळ समजून दुर्लक्ष करणेही चुकीचेच आहे, असे अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे कित्येक जण severe हृदयविकाराचा झटका किंवा तत्सम काही emergency मुळे आपला विनाकारण जीव गमावून बसतात ही विदारक सत्य परिस्थिती आहे.
  आपण या सगळ्या गोष्टींचे गांभीर्य कधी लक्षात घेणार हा खरा विचार करण्याचा मुद्दा आहे