OK
12
12

Order Summary

3 Products

 1,234

View Cart
MORE
Store Timings
  सुंदर, मुलायम त्वचा

  सुंदर, मुलायम त्वचा

  T.V. सुरु केला की दर २/३ जाहिरातींमागे एखाद्या क्रीमची किंवा अंगाला लावायच्या साबणाची जाहिरात असते आणि सगळे असा दावा करतात की ते product वापरल्याने त्वचा सुंदर, गोरी आणि मुलायम होईल. माझ्याकडे येणारे तरुण पेशंट्स पण मला हा प्रश्न नेहमी विचारतात की त्वचेसाठी काय वापरायला हवे ?
  मुळात त्वचेचे सौंदर्य किंवा आरोग्य ही काही इतकी वरवरची बाब नाही की जी केवळ बाह्य उपचारांनी किंवा किरकोळ निगा राखण्याने, साबण बदलून वापरण्याने ठीक राहील. शरीराचे कोणत्याही अवयवाचे स्वास्थ्य टिकवायचे असेल तर आहार, विहार, दिनचर्या या सगळ्याचा विचार करावा लागतो, हे विशेषतः या नव्या पिढीला समजावून सांगावे लागते.जेव्हा आम्ही त्यांची detail history घेतो आणि मग त्याचा होणाऱ्या लक्षणांशी संबंध जोडून बघतो तेव्हा ही तफावत लगेच लक्षात येते.
  त्वचेची २/३ अतिशय महत्वाची कार्ये सांगितलेली आहेत.पहिले आणि महत्वाचे कार्य म्हणजे शरीराचे बाह्य आघातापासून रक्षण करणे.यासाठी त्वचा चांगली चिवट आणि स्निग्ध असणे गरजेचे आहे.
  दुसरे कार्य म्हणजे शरीराचे तपमान नियंत्रित करणे. आपण उष्ण रक्ताचे प्राणी आहोत म्हणजे बाहेरच्या हवेचे तापमान कितीही थंड किंवा उष्ण झाले तरी आपल्या शरीराचे ठराविकच तपमान आपल्याला maintain करावे लागते तरच आपली सगळी कार्ये नीट चालू शकतात. यासाठी थंडीच्या दिवसात त्वचेची रंध्रे बंद करून घाम येण्याची प्रक्रिया बंद केली जाते आणि उष्णता शरीरातच कोंडून तपमान योग्य राखले जाते तर याउलट उन्हाळयाच्या दिवसात बाहेरच्या वाढलेल्या तापमानाचा सामना करण्यासाठी त्वचेची रंध्रे उघडून भरपूर घाम बाहेर टाकला जातो आणि शरीर जास्तीतजास्त थंड राखण्याचा प्रयत्न केला जातो.
  ह्या सगळ्या प्रक्रिया इतक्या नैसर्गिकपणे घडत असतात की आपण त्यांचा विचारही करत नाही पण हे सगळे तेव्हाच घडू शकते जेव्हा आपली त्वचा चांगल्या प्रतीची आणि निरोगी असेल.
  आपण जो आहार घेतो त्याचा परिणाम त्वचेवरही स्पष्ट दिसतो.जर आपल्या आहारात दूध, लोणी, तूप यांचा समावेश आवश्यक त्या प्रमाणात असेल तर त्वचा चमकदार, तेजस्वी, तुकतुकीत दिसते.आहारात सुकामेवा, शेंगदाणे, तीळ, खोबरे यासारखे पदार्थही अधूनमधून असायला हवेत.
  दिवसभरात आपण किती पाणी पितो, काय शारीरिक हालचाली करतो, किती घाम येतो यावर त्वचेचा ओलावा आणि elasticity अवलंबून असते.योग्य त्या प्रमाणात स्निग्धता आणि पाण्याचा ओलावा जर त्वचेला मिळाला नाही तर त्वचा आक्रसते,कोरडी पडते आणि निस्तेज होते.
  बदलत्या ऋतूंचाही परिणाम त्वचेवर होत असतो, हिवाळ्यात अतिथंड हवेमुळे त्वचेतील सगळी स्निग्धता शोषून घेतली जाते आणि त्वचा भयंकर कोरडी पडते, टाचांना भेगा पडतात, त्वचा पांढरट पडून खाज येऊ लागते.
  उन्हाळ्यात अतिउष्ण आणि रुक्ष हवेमुळे त्वचाही ” अपनी नमी खो देती हैं”
  यासाठी केवळ क्रीम किंवा moisturizer वापरून उपयोग होत नाही कारण ही स्निग्धता आतून यावी लागते.
  तरुण वयात खरं तर कशाचीच गरज पडता कामा नये पण आजकाल मुले diet च्या नावाखाली जे काही करतात त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागतो. एकीकडे भरपूर cheese घातलेले पदार्थ खायचे आणि एकीकडे आरोग्यदायी गायीचे तूप,दूध, लोणी यांना पाहून नाक मुरडायचे अशी यांची मानसिकता आहे.
  अंगाला, केसांना कधीच तेल लावायचे नाही आणि केस कोरडे झाले, शाईनच राहिली नाही म्हणून शाम्पू बदलत राहायचे अशी यांची स्थिती आहे.
  आमचे आजोबा ८७ वर्षांचे होऊन गेले पण कधीच काही तक्रार, सांधेदुखी जाणवली नाही कारण कायम १२ ही महिने अंघोळीनंतर थोडे खोबऱ्याचे तेल अंगाला चोळायची सवय !
  हल्ली ही हाडांची,सांध्यांची स्निग्धताही खूप कमी वयात फार कमी होते आणि मग पाठदुखी, मणक्यांचे आजार, osteoporosis,calcium deficiency असे एक ना अनेक आजार मागे लागतात.
  आपण आपलेच स्वास्थ्य टिकवण्याच्या दृष्टीने काय करायला हवे याचा विचार करायची आता वेळ आली आहे हे मात्र निश्चित !!