OK
12
12

Order Summary

3 Products

 1,234

View Cart
MORE
Store Timings
  पिझ्झा !! ओह Yummy

  पिझ्झा !! ओह Yummy

  आजचा विषय मला माझ्या मुलांनी सुचवलाय. They just love Pizza like any other kids in this world. पण मग मी जेव्हा आहाराचं पुस्तक लिहित होते तेव्हा या विषयावर भरपूर अभ्यास केलेला त्यांनी पाहिला होता. आज परत एकदा ती माहिती सांग म्हणाले.
  नेहमी नेहमी पिझ्झा खायचा नाही असं जेव्हा मी त्यांना म्हणाले होते तेव्हा ते म्हणाले की काय फरक आहे गं पराठा आणि पिझ्झा मध्ये! पराठा तर आग्रह करून खाऊ घालतेस आणि पिझ्झाला मात्र नाही म्हणतेस !! Not Fair !!
  दोन्ही मध्ये गहू आहेत,भरपूर भाज्या आहेत तर मग काय हरकत आहे ?
  लगेच माझ्यातली आई आणि आयुर्वेदिक डॉक्टर जागी झाली, मग काय सुरु lecture.
  तुमच्याही घरी हे नेहमी होत असेल, माझी अगदी खात्रीच आहे.पण आज मी तुम्हाला सगळी उत्तरं देऊन तयार ठेवते.
  आपण जेव्हा कोणत्याही प्रकारचा पराठा बनवतो तेव्हा त्यात कणिक म्हणजेच घरी गहू दळून आणलेले पीठ वापरतो, त्यात आपल्याला ज्या भाज्या आवडतील त्या चिरून टाकतो, बाकी लसूण,मिरची किंवा मीठ वगैरे basic गोष्टी ज्या चव येण्यासाठी टाकतो त्या मिसळून छान तूप वगैरे सोडून पराठा भाजतो आणि खातो. खरं तर याची तुलनाच होऊ शकत नाही पिझ्झाशी !! पण आता मुलांबरोबर debate मध्ये जिंकायचं तर मुद्दे तयार हवेतच नाहीतर ही हल्लीची मुलं दोन मिनिटात आपला पाडाव करतात.
  या उलट पिझ्झामध्ये मात्र generally base साठी मैदा वापरला जातो, हल्ली wheatbase किंवा multigrain ही मिळतात पण ते मोठ्या शहरात नाहीतर मैदा ठरलेला असतो, जोकी अजिबात healthy नाही हे आता आपल्याला पाठ झाले आहे, शिवाय तो पीठ आंबवून बनवला जातो म्हणजेच त्यात fermentation घडवले जाते आणि मग तो पुष्कळ जास्त तापमानाला bake केला जातो.नंतर या base वर अत्यंत आंबट चवीचा tomato sauce लावला जातो, त्यावर इतर भाज्या ज्यात्या देशाच्या पद्धतीनुसार किंवा आवडीनुसार किंवा availability नुसार वापरल्या जातात, त्यात रंगीत सिमला मिरची, Babycorn,mushroom,आलेपिनोस नावाच्या मिरच्या, आंबवून,खारवून टिकवलेले olives इत्यादी सगळ्या घटकांचा समावेश होतो. याशिवाय वरतून भरपूर प्रमाणात cheese टाकले जाते आणि पुन्हा ते cheese वितळून त्याचा विशिष्ट वास आणि स्वाद येईपर्यंत bake केले जाते. खाताना पुन्हा त्यावर tomato sauce आणि chillyflakes आणि seasoning टाकले जाते.
  हा झाला कृतीतील फरक. गुणधर्म आणि शरीरावर होणारे परिणाम या विषयी उद्या!!
  अधिक माहितीसाठी आमचे ” आहारजिज्ञासा ” पुस्तक नक्की वाचा
  पिझ्झाचे परिणाम
  आपण पिझ्झा कसा बनवतात ते पाहिले पण तो खाल्ल्यानंतर शरीरावर त्याचे काय परिणाम होतात तेही जाणून घेणे महत्वाचे आहे.
  यातील आंबवण्याची प्रक्रिया तसेच tomato sauce या सारखे घटक पित्त दोष वाढवतात, त्याचप्रमाणे शिमला मिरची, chili flakes, आलेपिनोस हे सगळे घटक तिखट चवीचे व त्यामुळे पित्त वाढवणारे आहेत, शरीरातील उष्णता वाढवणारे आहेत, दाह निर्माण करणारे आहेत.आपण नेहमीच बघतो की पिझ्झा खाल्ला, विशेषतः रात्री खाल्ला तर छातीत जळजळ होते,पोटात आग होते, आंबट ढेकर येतात किंवा आंबट पाणी घशाशी येते. दुसऱ्या दिवशी पोट एकतर साफ होत नाही किंवा अचानक जुलाब होतात, डोके दुखते, अस्वस्थ वाटते.
  हा परिणाम सर्व व्यक्तींना सारखाच जाणवेल असे नाही कारण प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते आणि त्यानुसार दिसणारा परिणामही !!
  ज्यांना अम्लपित्ताचा आधीच त्रास आहे किंवा बेकरीचे अथवा आंबवलेले पदार्थ खाल्लेकी त्रास होते त्यांना विशेषकरून पित्त वाढण्याचे परिणाम अधिक दिसतात.
  extra cheese पिझ्झा वगैरे खाताना जरी चांगले वाटले तरी ते पचायला फार जड असते आणि वारंवार खाल्ले गेले तर वजनही भरपूर वाढते.
  ज्या मुली किंवा मुले नोकरीच्या निमित्ताने मोठ्या शहरांमध्ये राहतात आणि नेहमी हे बेकरीचे पदार्थ, पिझ्झा,burgers खातात त्यांना हा वजन सतत वाढण्याचा परिणाम लवकर अनुभवास येतो. विशेषतः मुलींमध्ये तर त्याचे hormones वर ही मोठ्या प्रमाणत परिणाम झालेले दिसतात.
  नेहमी पिझ्झा खाण्यामुळे अग्नि मंद होऊनही वजन वाढते, जडपणा, आळस येतो.
  थोडक्यात काय तर क्वचित कधीतरी बदल म्हणून किंवा मजा म्हणून हे विदेशी पदार्थ खाणे वेगळे, त्यांचा नियमित आहार म्हणून कधीच स्वीकार न करणेच आपल्या स्वास्थ्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. या पुढे पिझ्झा order करताना हे लक्षात ठेवले म्हणजे झाले!!