OK
12
12

Order Summary

3 Products

 1,234

View Cart
MORE
Store Timings
    Basic instinct !
    ‘मी कोण आहे’ हा प्रश्न विद्वान तत्ववेत्त्या पासून सर्वसामान्य माणसापर्यंत सर्वांचंच कुतुहल वाढविणारा असतो, उत्कंठा वाढविणारा असतो. आपल्याला आपण कोण आहोत, कसे आहोत आपल्या स्वभावाची वैशिष्ट्ये काय आहेत हे जाणून घेण्याची खूप उत्सूकता असते, त्याबद्दल आपल्याला ऐकायला फार आवडते. बरेच जण भविष्य जाणून घेण्यासाठी ज्योतिषाकडे जातात त्यावेळी भविष्याची उत्सूकता तर असतेच पण त्याहीपेक्षा जास्त भावतं ते म्हणजे त्या निमित्ताने तो आपला भूतकाळ सांगण्याचा जो सोपस्कार तो भविष्य सांगणारा करतो तो, आपल्या स्वभावाचं तो जे वर्णन करतो ते आपल्याला जास्त आवडतं, किंबहुना जो ज्योतिषी हे वर्णन अचुक व सविस्तर सांगतो त्यावर आपला जास्त विश्वास बसतो.
    माणसाच्या वागण्याच्या निरनिराळ्या छटा असतात. आपल्या परीने आपण त्याचं कारण शोधायचा प्रयत्न करतो, आपण त्याला स्वभाव म्हणतो, सवय म्हणतो निरनिराळी नांवे देतो कारण आपल्याला त्याबद्दल कुतुहल असतं, त्याबद्दल जाणून घेणं ही आपली नैसर्गिक गरज असते. आयुर्वेदाच्या दृष्टीने आरोग्य रक्षणासाठी असलेली ही एक मूलभूत आवश्यकता असते इंग्रजीत ज्याला Basic Instinct म्हणतात ती असते.

    Basic instinct !

    आपण आजारी पडतो तेव्हा बरं होण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी निसर्गाने आपल्याला दिलेल्या असतातच. आपल्या भोवती सृष्टीचं नीट निरीक्षण केलं तर जनावरांच्या बाबतीत ते हे उपाय करतांना आढळून येतं. पण आपण सो कॉल्ड बुध्दिमान प्राणि आपण मात्र रोगनिवारणाच्या कृत्रिम साधनांनाच जास्त चांगलं मानतो. पण आपली निरोगी राहण्याची, रोगमुक्त होण्याची Basic Instinct आपल्यात in built असतेच ती ओळखण्याची, वापरण्याची मूलभूत गरज ही असतेच. दुपारी खुप जास्त जेवण झालं की संध्याकाळी हलकं खावं किंवा काहीच खाऊ नये असं वाटतं, भूक नसेल तेव्हा चमचमीत खावंसं वाटतं, फार अपचन झालं की उलटी करावीशी वाटते, उलटी झाली की बरं वाटतं इ. आपण हल्ली ह्या बरं होण्यासाठी निसर्गानं सुचविलेल्या संवेदना दाबून टाकायला, supress करायला शिकलोय उलटी करावीशी वाटत असेल तर आपण लागलीच उलटी थांबवण्याच्या गोळ्या घेतो. त्यामुळे आपण बरं होण्या ऐवजी एकातून दुसरा आजार निर्माण करतो. पण तरीही आपली बरं होण्याची नैसर्गिक उर्मीही असतेच, आणि ती ओळखण्याची गरज त्याहीपेक्षा तीव्र असते, ही अशी उर्मी असते हे आपल्याला माहीत नसते पण आतून तर ती उफाळून येत असते आपल्याला न समजल्याने आपण अस्वस्थ असतो का ते मात्र आपल्याला कळत नाही. आयुर्वेदानं मात्र ही गरज ओळखून हे समजण्याचा शास्त्रीय मार्ग सांगीतला आहे तो म्हणजे प्रकृती. आयुर्वेदाच्या शास्त्रीय परिभाषेत ह्याला प्रकृती म्हणतात.