OK
12
12

Order Summary

3 Products

 1,234

View Cart
MORE
Store Timings
  Year end party

  Year end party

  31 डिसेंबर म्हणजे वर्षाचा शेवटचा दिवस आणि नवीन वर्षाचे जल्लोषाने स्वागत करण्याची रात्र ! जग आता इतकं छोटं झालंय की आपण देखील आपला गुढीपाडवा सण म्हणून साजरा करत असलो तरी नवीन वर्ष 1 जानेवारी पासूनच मानतो. साहजिकच त्याचे स्वागत धुमधडाक्यात झाले पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. प्रत्येकाची साजरा करण्याची पद्धत वेगळी असू शकते. बहुतांश वेळेला हे सगळं वयोगटावर अवलंबून असतं.
  शालेय मुलांची,तरुणाईची,मध्यमवयीन लोकांची आणि वृद्धांची celebration ची कल्पना आणि style वेगळीच असणार यात शंका नाही.
  आज फक्त आरोग्याच्या दृष्टीने आणि घरगुती साध्या, “सोज्वळ ” celebration बाबतीत काही टिप्स द्याव्या असं वाटतंय कारण मुलांची आवड आणि हल्लीची खाद्य संस्कृती यांचा मेळ घालता घालता आपण काहीतरी भलतंच विरुद्ध अन्न खाऊ नये, हा लिहिण्याचा उद्देश!

  • कोणतीही पंजाबी पद्धतीची भाजी,पनीर इ.ची भाजी करताना त्यात दही किंवा लोणी,बटर यांचा वापर करू नका.
  • बाहेरून, विशेषतः हातगाडीवरून चायनीज पदार्थ आणून खाऊ नका. त्यात अत्यंत घाणेरडे, कमी दर्जाचे पदार्थ, तेल, सॉस इ. वापरले जाते.
  • पावभाजीत भरपूर टोमॅटो, चाट च्या सगळ्या पदार्थांमध्ये चिंचेचे पाणी, पास्ता, पिझ्झा यात परत टोमॅटो पासून बनवलेले सॉस असे आंबट घटक असतात.
  • वर्ष अखेर म्हणून त्यादिवशी उशिरापर्यंत जागरण केले जाते. भरपूर तिखट,मसालेदार आणि आंबट पदार्थ खाऊन पित्त वाढते आणि नवीन वर्षाची सुरुवातच डोकेदुखी,मळमळ, उलट्या, निरुत्साह अशी होऊ शकते, त्यामुळे आपल्याला कोणते पदार्थ चालतात,कशाचा त्रास होतो याचा अंदाज घेऊन आणि विचार करून मगच मेनू ठरवावा.
  • जर वरीलपैकी काही आंबट घटक असणारे पदार्थ बनवणार असाल तर त्याबरोबर निदान गोडाचा पदार्थ म्हणून दुधाचं काही होणार नाही, याची दक्षता घ्यावी कारण ते विरुद्ध अन्न होते. त्यामुळे बासुंदी,रबडी,रसमलाई,खीर हे नक्की टाळावे.
  • हिवाळा चांगलाच जाणवतो आहे,थंडी खूप आहे तर गारठ्यापासून स्वतःचे रक्षण करायला हवे. मुद्दाम अशा थंडीत दातांना ठणका बसेल अशा तापमानाचे आईसक्रीम खाणे, ज्युस पिणे,कोल्ड ड्रिंक्स पिणे हे टाळायला हवे.
  • फळे आणि दूध विरुद्ध असल्याने फ्रुट सॅलड, मिल्कशेक खाऊ नयेत.
   आपले आरोग्य अबाधित राखायचे असेल तर या टिप्स आपल्याला नक्की उपयोगी पडतील.
   So enjoy the party and welcome the new year!